Pune News : पिंपरी-चिंचवड ते गेट वे ऑफ इंडिया सायकलवारी; 26/11 च्या वीरजवानांना अनोखी श्रद्धांजली
चिंचवड येथील सायकल प्रेमींनी 26/11 मधील शहीद जवानांना गेट वे ऑफ इंडिया पर्यंत सायकलवर प्रवास करून आज (रविवारी) सकाळी मानवंदना दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appimage 2 चिंचवड येथील इको पेडलर्स ग्रुप, हंटर्स ट्रेकिंग आणि सोशल क्लब ग्रुपच्या वतीने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अकलूज येथील रॉयल रायडर्स ग्रुपचे देखील त्यांना सहकार्य लाभले.
या उपक्रमाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. चिंचवड येथील चापेकर पुतळ्यापासून शनिवारी रात्री नऊ वाजता ज्येष्ठ सायकल पटूंनी हिरवा झेंडा फडकावला.
57 पुरुष, 4 महिलांनी या सायकल प्रवासामध्ये भाग घेतला होता. आज (रविवारी ) पहाटे सहा वाजता हे सर्व सायकलपटू गेट ऑफ इंडिया जवळ पोहोचले.
26/11 चा भारतासाठी मोठा हल्ला होता.
अनेक राजकीय नेत्यांनीदेखील या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
सगळ्यांनी सायकलवारी करत श्रद्धांजली वाहिली.