Independence Day 2022: देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यादिनी पुण्यातील स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार असलेल्या या ठिकाणांना विसरुन चालणार नाही...
आगा खान पॅलेस: नगर रोडवरआगा खान पॅलेस आहे. हा राजवाडा सुलतान मोहम्मद शाह यांनी 1892 मध्ये बांधला होता. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत या स्मारकाची भूमिका होती.या ठिकाणी कस्तुरबा गांधीं यांची समाधी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेसरी वाडा: वाडा सर्वप्रथम गायकवाड सरकार आणि बडोद्याच्या राजपुत्राने बांधला होता. मात्र, नंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ती जागा विकत घेऊन त्यांचे कार्यालयात रुपांतर केले. हेच ठिकाण आहे जिथे लोकमान्य टिळकांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये केसरी ही क्रांतिकारी वृत्तपत्रे प्रकाशित केली आणि चालवली.
येरवडा कारागृह: आपल्या स्वातंत्र्यलढ्यात या 150 वर्षांच्या तुरुंगाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. येथेच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, मोतीलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या प्रख्यात क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
फुले वाडा: बहुमजली इमारतींध्ये लपलेला फुले वाडा हे एकेकाळी समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे घर होतं. ज्यांनी मुलींच्या शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आपलं जीवन पणाला लावलं.
चापेकर वाडा: देशासाठी बलिदान देणाऱ्या चापेकर बंधूंना आदरांजली म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून चापेकर स्मारक समितीने संग्रहालयाची स्थापना केली.