Pune News : तीन राज्यात भाजप विजयी; पुण्यात भाजपकडून विजयी जल्लोष

भारतीय जनता पार्टीने मध्यप्रदेश , राजस्थान, तसेच छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्या नंतर भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्यावतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोठ्या मोठ्याने घोषणा देत त्यांनी पेढे वाचून आनंद साजरा केला.

पुण्यातील फर्ग्यूसन रस्त्यावरील कलाकार कट्ट्यासमोर सगळे भाजपचे कार्यकर्ते एकत्र आले होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.
पुण्यातील अनेक रस्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
यावेळी बोलताना घाटे म्हणाले ,' पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे . केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकार हे जनतेचे सरकार आहे तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी आहे'
यावेळी घाटे यांच्यासह पुणे भाजप प्रभारी माधवजी भांडारी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सचिव वर्षा डहाळे,युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे उपस्थित होते.
Pune