Railway News : पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना दिलासा, बिकानेर पुणे एक्स्प्रेसचा मिरज पर्यंत विस्तार, जाणून घ्या वेळापत्रक
मध्य रेल्वेनं बिकानेर पुणे एक्स्प्रेसचा सागंली जिल्ह्यातील मिरज जंक्शन पर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं पुण्यातील काही भागासह, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होणार आहे. (प्रातिनिधिक फोटो)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिकानेरवरुन मिरजसाठी रेल्वे सोमवारी सकाळी साडे सात वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 7.35 वाजता पुणे जंक्शन येथे पोहोचेल. तिथून ती गाडी मिरजसाठी सुटेल, ती दुपारी 1.45 वाजता पोहोचेल. (प्रातिनिधिक फोटो)
मिरज बिकानेर ही एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी 2.25 मिनिटांनी सुटेल. पुण्यात ही एक्स्प्रे रात्री 10.10 मिनिटांनी पोहोचेल. तिथे अर्धा तास थांबल्यानंतर 10.40 मिनिटांनी गाडी बिकानेरसाठी सुटेल.दुसऱ्या दिवशी रात्री 10.40 मिनिटांनी एक्स्प्रेस बिकानेरला पोहोचेल. (प्रातिनिधिक फोटो)
पुणे आणि मिरज दरम्यान ही गाडी जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली या स्टेशनला थांबेल.(प्रातिनिधिक फोटो)
बिकानेर- पुणे- मिरज एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा धावणार आहे. या एक्स्प्रेसचा फायदा सातारा, सांगलीतील प्रवाशांना पुण्याला