Pune Valentine Day : पुणेकर जगात भारी! 40 जोडप्यांनी 'व्हॅलेंटाईन डे'लाच बनवला लग्नाचा परफेक्ट मुहूर्त
'व्हॅलेंटाईन डे' (pune) हा प्रेमाचा Valentine Day 2023 दिवस असतो. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया स्पेशल दिवशी फक्त प्रेम व्यक्त करायचं नाही तर आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय पुण्यातील अनेक तरुणांनी घेतल्याचं दिसत आहे.
पुण्यातील अनेक लग्नाळू तरुण-तरुणींनी लग्नासाठी व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त ठरवला आहे. विवाह नोंदणी कार्यालयात लग्न करणार्या जोडप्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
या केंद्रावर तब्बल चाळीस जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डेचा मुहुर्त साधत आज विवाह करायचं ठरवलं आहे. या जोडप्यांना लगेच जागेवर विवाह प्रमाणपत्र देण्याची तयारी विवाह नोंदणी कार्यालयाने केली.
मित्र आणि कुटुंबीयांची देखील उपस्थिती आहे. अनेक जोडपे विवाहासाठी उत्सुक असल्याचं बघायला मिळत आहे.
मित्र आणि कुटुंबीयांच्या साक्षीने ही जोडपे आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विवाहबंधणात अडकणार आहेत.
विवाह सोहळा म्हटलं की, पंचांग आणि मुहूर्त बघितले जातात. तो मुहूर्त न चुकता पाळला जातो.
मात्र या नव्या पीढीचा मुहूर्तापेक्षा प्रेमाच्या दिवसाला विवाह करण्याकडे कल दिसत आहे.