पुण्यात वाहनासकट दुचाकीस्वाराला टोईंग व्हॅनमध्ये भरलं! नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्याची ही कुठली पद्धत?
पुण्यात वाहनासकट दुचाकीस्वारालासुद्धा टोईंग व्हॅनमध्ये भरल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नानापेठ परिसरात वाहतुक पोलिसांनी ही करामत केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंबंधित दुचाकीस्वाराची दुचाकी नो-पार्किंग झोनमध्ये असल्याचा दावा करत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेवर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यात वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये भरलं. ही घटना काल दुपारी घडली. या घटनेनंतर नो-पार्किंगमध्ये गाडी असली तरी कारवाईची ही पद्धत कितपत योग्य आहे? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
सर्वाधिक दुचाकी वाहनांचं शहर म्हणून पुण्याला ओळखलं जातं. त्याचबरोबर सातत्यानं या दुचाकी वाहनांची संख्या सातत्यानं वाढत आहे.
सध्या पुणे शहरात पार्किंगची समस्या सध्या निर्माण झाली आहे. अनेकदा पुणे वाहतूक पोलीस आणि पुणेकरांमध्ये अनेकदा वाद झाल्याच्या घटानाही समोर आल्या आहेत.
अनेकदा वाहतूक पोलिसांची अरेरावी दर्शवणारे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत. नानापेठ परिसरात घडलेली घटना ही त्यापैकीच एक. या घटनेवरुन अनेक आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळालं आहे.