Pune ST Bus Accident : मोठा अनर्थ टळला! जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एसटी बस डिव्हायडरला धडकली अन्...
जुना पुणे मुंबई महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस डिव्हायडरला धडकली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास सेंट मदर तेरेसा उड्डाणपूलाखाली घडली.
मएच 20/बीएल 1821 ही बस घेऊन चालक तानाजी सरवदे त्यांच्या सहकारी वाहकासोबत बोरिवली येथून पुण्याकडे येत होते.
चिंचवड येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना मदर तेरेसा उड्डाणपुलाखाली आल्यानंतर एका रिक्षा चालकाने अरुंद जागेतून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये कोणताही अपघात होऊ नये, तसेच रिक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी बस चालक सरवदे यांनी बस डिव्हायडरकडे वळवली.
दरम्यान, बस डिव्हायडरवर आदळली गेल्याने अपघात झाला. यावेळी बसमध्ये वीस प्रवासी होते. सरवदे यांनी प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण ठेवले.
यामध्ये बसचे नुकसान झाले आहे. मात्र सर्व प्रवासी, बस चालक आणि वाहक सर्वजण सुखरूप आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली. पोलिसांनी बघ्यांची गर्दी व संथ झालेली वाहतूक सुरळीत केली. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी पाठवून देण्यात आले आहे.