Photo Gallery : पुणे - कात्रजमध्ये एकामागून एक 10 ते 12 गॅस सिलेंडरचे स्फोट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Mar 2022 07:05 PM (IST)
1
कात्रजजवळ 10 ते 12 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी अथवा जखमी झालेले वृत्त नाही
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कात्रज, गंधर्व लॉन्सजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे 100 गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. यामध्ये अचानक स्फोट झाला.
3
एकामागून एक दहा ते 12 गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
4
कात्रजमध्ये अचानक गॅस सिलिंडरच्या स्फोटाचे आवाज ऐकू आले. स्फोट झाला त्यावेळी बाहेर लहान मुले खेळत होती.
5
गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरातील घरावरील पत्रे उडाले. गाड्या जळून खाक झाल्या.
6
परिस्थितीचे गांभिर्य पाहून परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
7
सध्या आग आटोक्यात आल्याचे अग्निशामन दलाकडून सांगण्यात आले आहे.