In Pics : दगडूशेठ गणपतीसाठी 228 तोळे सोन्याचा खास पाळणा; यंदाचा गणेशजन्म सोहळा धुमधडाक्यात होणार
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा मुख्य गणेशजन्म सोहळा यंदा सुवर्ण पाळण्यात हा सोहळा पार पडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभक्तांनी दिलेल्या देणगीतून हा पाळणा साकारण्यात आला आहे.
पाळण्याकरता पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टँड तयार करण्यात आला असून त्यावर 8.5 किलो चांदी वापरण्यात आली आहे.
तसेच त्यावर सोनाचे पॉलिश देखील करण्यात आले आहे.
या स्टँडवर 16 बाय 24 इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला असून त्याकरता 2 किलो 280 ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.
स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्ण पाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा होणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच बुधवार, दिनांक 25 जानेवारी रोजी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
यंदा धुमधड्याक्यात हा जन्मोत्सव साजरा होणार आहे.