In Pics : थॅक्यू पोलीस काका! दमले असाल जरा चहा घ्या; पार्ट्या न करता पुण्यातील तरुणांचं ह़टके थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन
एकीकडे पुण्यातील तरुण मंडळी पार्टी करण्यात व्यस्त होती. तर दुसरीकडे काही तरुण पोलिसांची काळजी घेण्यात व्यस्त दिसले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी शेकडो पोलीस बांधव पुणेकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर असतात. नवीन वर्षाच्या बंदोबस्तासाठीही ते तैनात असतात.
नवीन वर्षाचा जल्लोष संपल्यानंतर पोलिसांचा थकवा काही प्रमाणात दूर व्हावा, यासाठी ही तरुण मंडळी दरवर्षी सेलिब्रेशनमध्ये सहभागी न होता. पोलीस बांधवांना चहा-पाणी वाटून नव्या वर्षाची सुरुवात करतात आणि त्यांचे आभार मानतात.
चतुःश्रृंगी पोलिस चौकी , पुणे विद्धापीठ चौक , श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदीर, अलका टॅाकीज् चौक गुडलक चौक, डेक्कन पोलीस आणि सांगवी पोलिस स्टेशन या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांना चहा-पाण्याचं वाटप करण्यात आलं.
युवा स्पंदन संस्थेचे करण सुरवसे, आदित्य राऊत, रितेश ठोबळे, संतोष शिंदे आणि मैत्री युथ फाउंडेशन संस्थेचे सुहासराज महाडीक, आदर्श सोनावने, आर्यन देसले, कृष्णराज ढोरे, रोहन पोटे, कुणाल लाड या तरुणांनी एकत्र येत हा उपक्रम सुरु केला आहे.
पोलीस बांधवांचे आभार मानण्यासाठी या तरुणांनी हा उपक्रम सुरु केला आहे.
यांचा उपक्रम पाहून पोलिसांनी तरुणांचं कौतुक केलं आहे.
आणि पोलिसांनीही त्यांचे आभार मानले आहे.