In Pics : पुण्यात अजित पवारांच्या हस्ते वाहनांना ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ स्टिकर्स लावले

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक उल्लेख असणार स्टिकर्स वाहनांवर लावले आहे.

ajit pawar

1/7
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक उल्लेख असणार स्टिकर्स वाहनांवर लावले आहे.
2/7
संभाजीराजेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार पुण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचं गंजी स्वागतदेखील केलं आहे.
3/7
छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणायचं कि धर्मवीर म्हणायचं यावरुन अजित पवारांना धारेवर धरण्यात आलं होतं. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण पेटलं होतं. मात्र या सगळ्या वादानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार पुण्यात आले आहेत.
4/7
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक उल्लेख असणारे स्टिकर्स छापण्यात आले आहे. प्रत्येक राष्ट्रवादी्चाय कार्यकर्त्यांच्या गाडी वर हे स्टिकर्स लावण्यात येणार आहे.
5/7
हे स्टिकर्स पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकार्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटण्यात येणार आहेत.
6/7
राष्ट्रवादीचे नेते त्याच्या वाहनांवर, घरांवर आणि इतर ठिकाणी लावणार आहेत.
7/7
त्याचबरोबर महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांनाही मतदारांपर्यंत हे स्टिकर्स पोहचवण्यासाठी देण्यात येणार आहेत.
Sponsored Links by Taboola