Pune Ganeshotsav 2023 : दगडूशेठ गणपतीला आकर्षक विद्युत रोषणाई, भाविकांची मोठी गर्दी
गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... च्या जय घोषासोबतच जय श्रीराम, जय श्रीरामच्या नादघोषात श्री हनुमान रथातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सभा मंडपात अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
तसेच संपूर्ण सभामंडपाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली.
ही विद्युत रोषणाईत 300 प्रकारची असल्याचं दगडूशेठचे विश्वस्त महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं.
तसेच ही प्रतिकृतीमधील कळस हा 101 फुटांचा आहे.
दगडूशेठचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं यावेळी पाहायला मिळालंय
मंदिरापासून निघालेली मिरवणूक तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात आली.
मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड यांसह गंधाक्ष ढोल ताशा पथक देखील सहभागी झाले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला.
बुधवार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी पहाटे 6 वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 31 हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत.