Pune news : पानशेतमध्ये 16 शाळेतील विद्यार्थी एकाच शाळेत शिकणार; शाळेच्या इमारतीचं काम पूर्ण, राज्यातील पहिलाच प्रयोग
पुण्यातील (Pune) जिल्ह्यात 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याऐवजी शाळा (school) एकत्रिकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे जिल्हा परिषदेचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. 20 पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांचा एकत्रिकरणाचा पर्याय देण्यात आला आहे.
हा पहिलाच प्रयोग असणार आहे. 20 पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांचा एकत्रिकरणाचा पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सोळा शाळांची एक शाळा होणार आहे.
वेल्हे तालुक्यातील पानशेत गावात ही शाळा उभारली असून लवकरच ग्रामीण भागातील विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी दाखल होणार आहे.
या शाळेचं काम पू्र्ण होत आलं आहे.
20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद कराव्या असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण परिसरातील अनेक विद्यार्थी शाळेअभावी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता होती.
मात्र यावर पुणे जिल्हा परिषदेने उत्तम पर्याय काढून 16 शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच शाळेत एकत्र शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, असं पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितलं आहे.
लवकरच या शाळेत विद्यार्थी दाखल होणार आहे.