In Pics : गुलाबी रंगात रंगली पुण्याची सायंकाळ, मनमोहक फोटो पाहून तुम्हीही व्हाल प्रसन्न
सायंकाळ म्हटलंकी मनात शांत, निवांत अशाच फिलिंग्स येतात. त्यात सायंकाळ जर आज पु्ण्यात होती तशी असेल तर क्या बात! (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात आज जी सायंकाळ पुणेकरांनी पाहिली ती कोणत्या सुंदर चित्रापेक्षा कमी नव्हती. अगदी स्वप्नवत अशा या सायंकाळचे फोटो नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
या फोटोंमध्ये पुण्याने वेगवेगळ्या रंगाची चादर ओढल्याचं दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
कुठे गुलाबी, कुठे केशरी अशी रंगबीरंगी सायंकाळ मनाला मोहणारी आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
या फोटोंना मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी आपआपल्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
पुण्यातील विविध भागाती हे फोटो असून कुठे इमारतींनी तर कुठे रस्ता फोटोंत दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मान्सून अगदी उंबरठ्यावर आला असून महाराष्ट्रातील काही भागात हजेरीही लावली आहे, त्यामुळे वातावरणात अनेक बदल होत आहेत. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
वातावरणातील बदलामुळे ही सायंकाळ इतकी सुंदर दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
पुण्यासह पालघरमधील काही फोटोही समोर आले असून यामध्ये समुद्र किनारी सुंदर सायंकाळ पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य - संतोष पाटील, पालघर प्रतिनिधी)
पालघर जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळनंतर विजांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर किनारपट्टीवरील पर्यटकांना मोहवणारे चिचणी ह्या पर्यटन स्थळीची ही दृश्य आहेत. (फोटो सौजन्य - संतोष पाटील, पालघर प्रतिनिधी)