Pune Bandh: वडगावशेरी परिसरात पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद; पाहा फोटो!
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत (Chatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची (Pune Bandh) हाक दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यपालांविरोधात व्यापारी संघटनांनंतर पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे.
यात कोणताही उचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
राज्यपालांसह वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात सगळ्या संघटना एकवटल्या आहेत.
पी एम पी एम एल ही सार्वजनिक वाहतूक बस सेवा बंद राहणार आहे.
पुण्यातील वडगावशेरी परिसरात पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
भाजी मार्केट आणि काही प्रमाणात दुकानं सुरु आहेत. मात्र रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.
वडगावशेरी, कल्याणी नगर, चंदन नगर परिसरात औषधांची दुकानं, भाजी मार्केट सुरु आहेत.
तसेच काही शाळांना सुट्टी तर काही शाळा सुरू आहेत, चौका चौकात पोलीस थांबलेले दिसत आहेत
पुण्यातील महत्वाचा रस्त्यांवर शांतता पसरली आहे. काही प्रमाणात वाहतूक सुरु आहे. मात्र रस्त्यांवरील सगळे दुकानं बंद आहेत.