Pune Porshe Car Acident : पुण्यातील पोर्शे अपघाताला 6 महिने पूर्ण; तरुणांकडून घटनास्थळी कॅंडल मार्च, पालक न्यायाच्या प्रतिक्षेत!
सहा महिन्यापूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगातील पोर्शे कारने धडक दिल्याने अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा मृत्यू झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया घटनेला सहा महिने पूर्ण झाले, मात्र मृत्यू पडलेल्या या दोघांना अजूनही न्याय मिळाला नाही. त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आणि त्या दोघांनाही आदरांजली वाहण्यासाठी तरुणाईने रस्त्यावर उतरून मेणबत्ती घेऊन येत ती पेटवून आदरांजली वाहिली.
विशेष म्हणजे, राजकीय धामधूमित राजकीय पक्ष विरहीत ही आदरांजली वाहण्यात आली.
कल्याणीनगर परिसरात १८ मे रोजी मध्यरात्री श्रीमंत अल्पवयीन कारचालक असलेल्या भरधाव आलिशान पोर्शे कारने आयटी इंजिनिअर असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक देऊन त्यांचा जीव घेतला.
याघटनेला आज (दि. १८ नोव्हेंबर) सहा महिने पुर्ण होत आहेत. हे प्रकरण पुण्यासाठी आणि पुणे पोलिसांसाठी महत्वाचे ठरले होते. नाट्यमय घडामोडी तसेच श्रीमंतीचा माज तसेच मुलांना पोलीस ठाण्यात पिझ्झा देणे यासह पैशांच्या जोरावर व राजकीय पावरचा वापर आणि ससून रुग्णालयात रक्तबदल यामुळे राज्यभरात हे प्रकरण गाजले.
पोलिसांनी अत्यंत तळमळीने याप्रकरणाचा तपासकरून मुलाचे आई-वडिल, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर व एक कामगार तसेच रक्तबदलात मदत करणारे आणि अशा सर्वांना अटक केली.
त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे. याघटनेचा तपास सुरू आहे.
दरम्यान, याघटनेला ६ महिने पुर्ण होत असल्याने या अपघातात जीव गमावलेल्या अनिश व अश्विनी यांना आदरांजली वाहण्यासाठी तरुणाईने अपघातास्थळी एकत्रित जमत एक मेणबत्ती पेटवून त्यांना आदरांजली वाहिली.