PHOTO : इंद्रायणी नदीत पुन्हा फेसाळ पाणी
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
08 Jun 2023 11:27 AM (IST)
1
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला काहीच तास उरले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तरी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरुच आहे.
3
इंद्रायणी नदीत आज पुन्हा फेसाळ पाणी वाहतंय, जे वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका ठरत आहे.
4
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा याला कारणीभूत ठरत आहे.
5
पिंपरी चिंचवड हद्दीतील अनेक कंपन्या इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडतात
6
परिणामी नदीची अशी दयनीय अवस्था होते.
7
एबीपी माझाने जानेवारी महिन्यात हा प्रकार समोर आणला, तेव्हा सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले होते.
8
मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने कारवाईचा हा फार्स होता हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
9
त्यामुळे पालखी प्रस्थानाची वेळ आली असतानाच इंद्रायणी नदीत पुन्हा फेसाळ पाणी पाहायला मिळत आहे