PHOTO : संकष्ट चतुर्थीदिवशी साकारला सुपारीवरील गणपती बाप्पा, पुण्याच्या कलाकाराची अनोखी कला
आज संकष्ट चतुर्थी. या दिवशी आम्ही आपल्याला एका अवलिया कलाकाराची भेट घडवणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील अनुजा चैतन्य जोशी (कुलकर्णी) यांनी सुपारीवरील बाप्पा साकारला आहे.
मला शाळेत असल्यापासून ड्रॉईंगची खूप आवड आहे. माझं अभिनव कॉलेज मध्ये कमर्शियल आर्ट च शिक्षण झालं आहे, असं अनुजा यांनी सांगितलं.
आतापर्यंत मी बऱ्याच प्रकारच्या पेंटिंग केल्या आहेत. जसं की, माझ्या हातावर नवरात्रीमध्ये महालक्ष्मी च पेंटिंग केले होते.
खूप विचार केल्यानंतर एक कल्पना सुचली आपण जर सुपारी वर पेंटिंग केलं तर जमेल का मग सुपारीवर पेंटिंग करायला घेतलं मी ते झाल्यानंतर खूप छान वाटत होते, असं अनुजा यांनी सांगितलं.
गणपतीची मूर्ती नसेल तर आपण सुपारी ठेवतो पण मी सुपारी वरच गणपती बाप्पा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, मला ते पूर्ण करायला 7 तास लागले, असं अनुजा यांनी सांगितलं.
सुपारीवरील हा बाप्पा फारच आकर्षक दिसतोय. अनुजा यांच्या या कलेचं सर्व स्तरांतून कौतूक होत आहे.