Pune News : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात: मुख्यमंत्र्याकडून आधी मदत अन् नंतर थेट रुग्णालयात जाऊन विचारपूस
आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांच्या टीम कडून जाणून घेतली.
आज पहाटे पावणे चारच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात 40 ते 45 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यातील 13 जणांचा या अपघातात मृत्यु झाला.
पहाटे हे प्रवासी पुण्याहून मुंबईकडे येत असताना अचानक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यामुळे ही बस खोल दरीत कोसळली.
सकाळी ही दुर्घटना घडल्याचे कळल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाला फोन करून या घटनेची माहिती जाणून घेतली.
तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्य करणारे हायकर्स आणि आयआरबी रेस्क्यू टीममधील सदस्यांशीही फोनवरून संवाद साधून त्यांच्याकडून या दुर्घटनेची माहिती घेतली.
यानंतर त्यांनी तातडीने या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील असे जाहीर केले.
त्यानंतर खारघर येथील रुग्णालयात जाऊन जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हा अपघात नक्की का आणि कोण्याच्या चुकीमुळे घडला ते जाणून घेतले. तसेच मदतकार्यात आलेली आव्हानेही समजून घेतली.
यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तसेच इतर सर्व अधिकारी देखील