जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली, 13 प्रवाशांचा मृत्यू
Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये 40 ते 45 लोक होते. यामधील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे.
पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत 25 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
आणखी आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अद्याप 15 ते 20 प्रवासी दरीत अडकल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरम्यान, घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम दाखल झाली आहे. खासगी रुग्णालयातील डॅाक्टर्संना देखील मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. खासगी बसमध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात असताना ही घटना घडली आहे. ही बस 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.