Pune News : गोवा-हजरत निजामुद्दीन रेल्वेतून धुर; चार तासांपासून रेल्वे वाहतूक खोळंबली, नेमकं काय झालं?

मिरज पुणे लोहमार्गावर वास्को निजामुद्दीन गाडीस होणार मोठा अपघात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गोव्यावरून निघालेली हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या गाडीच्या चाकातून अचानक धुरा येताना दिसल्याने नीरा रेल्वे कर्मचाऱ्यांनी ती गाडी तात्काळ रोखली. त्यामुळे पुढे मोठा होणारा अपघात टळलाय.

मात्र या घटणेमुळे जवळजवळ पाच तासांहून आधीक वेळ मिरज पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबा झाला होता.
गोवा येथून हजरत निजामुद्दीनकडे निघालेली रेल्वे नीरा रेल्वे स्टेशनमधून पहाटे पाचच्या सुमारास जात असताना एम.2 डब्याच्या एका चाकातून आग दिसून आली.
नीरा रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या गाडीच्या गार्डला लाला सिग्नल दिला.
गाडी आहे त्या स्थितीत सकाळी आठ वाजेपर्यंत तशी उभी होती.
यामुळे मागुन येणारी पहाटेची सह्याद्री एक्सप्रेस, दर्शन एक्सप्रेस, पुणे सातारा डेमो या प्रवासी गाड्या मागे अडकून पडल्या होत्या. कालांतराने वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कमुळे मोठा अपघात टळाला आहे.