Pune news : याला म्हणतात संरक्षणाचं खरं बंधन! प्रशांत जगताप मणिपूरच्या महिलांसाठी बनले 'दादा'; थेट मणिपूरमध्ये रक्षाबंधन केलं साजरं
पुण्यातील शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी थेट मणिपूर मधील तेरापूर गावात रक्षाबंधन साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमणिपूरमधील तेरापूर येथे आपत्तीग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तू देऊन येथील महिला भगिनींसमवेत रक्षाबंधन साजरा केला.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर आम्ही आवाहन केल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या मित्र परिवाराने मोठ्या संख्येने मणिपूर मदत निधी गोळा केला.
या मणिपूर मदतनिधीमधून जमा झालेल्या रकमेत धान्य, कपडे ,जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप आज तेरापूर गावांमध्ये केले.
यावेळी येथील महिला भगिनींनी राखी बांधून औक्षण केले.
निश्चितच भाऊ म्हणून यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची सर्वांची आहे.
महाराष्ट्रात जरी राहत असलो तरी मणिपूर मधील महिला भगिनींसाठी आमच्यासारखे हजारो भाऊ या पुढील काळात येथील मदत कार्यामध्ये अग्रेसर असतील, हा संदेश या निमित्ताने दिला.
यावेळी अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.