In Pics : हक्काच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचं आंदोलन
पर्वती विधानसभा मतदार संघातील विविध वसाहती आणि सोसायट्यांमधील भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपर्वती जलकेंद्रातून पद्मावती पंपिंग स्टेशनपर्यंत आवश्यक पाणीपुरवठा होत नसल्याने विस्कळीतपणा आल्याचे आधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकाना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे.
पाणीपुरवठा योग्य दाबाने व सुरळीत व्हावा, नागरिकांच्या न्याय आणि हक्का करिता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वारगेट पाणीपुरवठा विभागाजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपोषण आंदोलन केले.
या आंदोलनात शहरप्रमुख प्रशांत जगताप यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
येत्या गुरुवारी 19 जानेवारीला संपूर्ण शहरातील पाणीपूरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळे अनेक पुणेकरांना त्रास सहन करावा लागणार आहे
त्यांच्या त्रास कमी व्हावा आणि पुणेकरांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आंदोलन सुरु केलं आहे.