Manoj Jarange Patil : पुण्यात जरांगे पाटलांच्या आज मॅराथॉन सभा, पुन्हा एकदा मराठे एकवटणार
मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीनंतर आज थेट पुणे जिल्ह्यात तोफ धडाडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज जरांगे पाटील सभा घेणार आहे. या सभेसाठी लाखो मराठे पुन्हा एकवटल्याचं पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्ह्यात मराठे एल्गार करणार आहेत. या मॅराथॉनसभेला लाखो मराठे हजेरी लावणार आहेत.
सकाळी सात वाजता जरांगे पाटील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांंच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहे.
त्यानंतर ते 10 वाजता जुन्नरला येणार आहे. तिथे त्यांचं जय्यत स्वागत करण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता त्यांनी खेड राजगुरुनगरमध्ये सभा होणार आहे.
खेडची सभा झाल्यानंतर 3 वाजता त्यांची बारामतीत सभा होणार आहे. बारामतीत तीन हत्ती चौकात ही सभा होणार आहे.
5 वाजता फलटण आणि त्यानंतर रात्री 8 वाजता दहिवडीत भेट देणार आहेत.