जय भोले... सहावं ज्योतिर्लिंग भीमाशंकरमध्ये भक्तांची गर्दी; माजी गृहमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न
हर हर महादेवच्या गजरात पुण्यातील भीमाशंकर परिसर दुमदुमून गेला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाशिवरात्री निमित्त माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा पार पडली.
बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून भीमाशंकर येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
रात्री बाराच्या सुमारास दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ही महापूजा पार पडली.
मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्ते पहिली पूजा केल्यानतंर मुख्य महापूजेला सुरुवात होते.
मंत्राच्या घोषात महादेवाच्या पिंडीवर दूध, दही, मध, साखर यांच्या अभिषेक केल्यानतंर बेल वाहून आरती यावेळी करण्यात आली.
यांनतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी आसाम सरकारकडून करण्यात आलेल्या दाव्यानंतर भीमाशंकर ज्योतिर्लिंग चर्चेत आलं होतं.
आसाम सरकारने सहावं ज्योतिर्लिंग भीमाशंकर आसाममध्ये असल्याचा दावा केला होता.