Tukaram Beej 2023 : संत तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस; देहू नगरी दुमदुमली
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झालं त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया निमित्ताने देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झालेत.
आज 375 वी तुकाराम बीज आहे. तुकोबारायांनी ज्या स्थळावरून वैकुंठगमन केलं त्या स्थळावर नांदुरकी नावाचं वृक्ष आहे.
तुकाराम बिजेला दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी नांदुरकी वृक्ष प्रत्यक्ष हलतो, याची अनुभूती वारकरी आणि भाविकांना येते, असं सांगितलं जातं.
याच वातावरणात शेतकरी तुकोबारायांना साकडं घालणार आहे.
या सोहळ्याची सुरुवात कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर या दिमाखदार सोहळ्यापुर्वी तुकोबारायांच्या पादुकांची आरती केली जाईल. काही अंतरावर असलेल्या तुकारामांच्या वैकुंठ गमन मंदिरात पालखी काढण्यात येईल.
हजारो वारकरी या पालखीत सहभागी होणार आहे.
मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.