Ganesh Chaturthi 2022 : पुण्यातील काशिकर कुटुंबियांनी केरळमधील 'हाऊस बोट' संकल्पनेवर आधारित साकारला नयनरम्य देखावा
तब्बल दोन वर्षांनंतर घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. या निमित्ताने भक्तांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअसाच उत्साह पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील काशिकर कुटुंबियांच्या घरी पाहायला मिळाला. स्नेहल काशिकर आणि मंदार काशिकर या दाम्पत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
यावेळी त्यांनी केरळमधील हाऊस बोट या संकल्पनेवर आधारित सुंदर असा देखावा साकारला आहे.
या देखाव्यात केरळमधील नयनरम्य निसर्गसौंदर्य दाखविण्यात आले आहेत.
ज्या प्रमाणे केरळमधील घराची रचना असते. लाकडी वस्तूंचा वापर यामध्ये केला जातो. अगदी तशीच हुबेहूब प्रतिकृती येथे साकारण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, हा देखावा पूर्णपणे पर्यावरणपूरक असा आहे. टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तूंचा वापर या देखाव्यासाठी करण्यात आला आहे.
हा देखावा सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतोय.