Jejuri : सदानंदाचा येळकोट...येळकोट येळकोट जय मल्हार....! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंडोबाच्या दर्शनाला
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.
मुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे आणि जेजुरीला भेट देणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली
राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडून राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे. राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे, , असे साकडे त्यांनी यावेळी खंडोबारायाच्या चरणी घातले.
मार्तंड देवस्थानच्या वतीने एकनाथ शिंदेंना घोंगडी आणि खंडेरायाची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले
खंडोबाचा खंडा देखील एकनाथ शिंदेनी आणि खासदार श्रीरंग बरणेंनी उचलला.
खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे या वेळी उपस्थित होते.
मार्तंड देवस्थानच्या वतीने एकनाथ शिंदेंना घोंगडी आणि खंडेरायाची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले