Pune news: दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले मंगलाष्टकांचे सूर; दणक्यात पार पडला श्री वल्लभेश मंगलम् विवाह सोहळा
मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यनगरीमध्ये... कसबा, गुपचुप, मोदी, माती, चिमणीच्या दर्शना जाऊ दे... सारसबाग तळ्यातला गणपती, त्याच्यापुढे दशभुजा... आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती या पुण्यनगरीमध्ये, त्याचे दर्शन मानवास घडता आनंद वाटे मना... कुर्यात सदा मंगलम् असे मंगलाष्टकांचे सूर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षता व फुलांची उधळण आणि पारंपरिक वेशात पुण्यातील प्राचीन व प्रसिद्ध गणपती मंडळांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चैत्र शुद्ध द्वितीयेला दुपारी 12 वाजून 41 मिनिटांनी श्री वल्लभेश मंगलम् हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात थाटात पार पडला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता.
श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभा मंडपात ठेऊन सर्व पारंपरिक विधी पार पडले. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्र पठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली.
सभा मंडपात विविधरंगी पडद्यांची व फुलांची आकर्षक आरास करुन लग्नमंडपाचे स्वरुप देण्यात आले होते. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते व-हाडी मंडळीच्या भूमिकेत असल्याने पारंपरिक वेशात लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.
भगवान श्री गणेशाच्या शक्तींचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर देवी सिद्धी आणि बुद्धी यांचा विचार येतो. तथापि गाणपत्य संप्रदायात श्री गणेशांच्या विविध शक्तींचा उल्लेख केलेला आहे.
देवी वल्लभा आणि तिने युक्त असणाऱ्या भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम आहे. त्यामुळे हा सोहळा मंदिरात थाटात साजरा झाला.
पुण्यातील प्राचीन देवस्थानांचे प्रमुख, मंडळाचे कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.