Maharashrian Girl in Ladakh: याला म्हणतात संस्कृतीचं जतन! महाराष्ट्राची 'लाडकी नऊवारी' थेट लडाखच्या दारी
महाराष्ट्राचं लाडकं वस्त्र नऊवारी परिधान करुन सुरभी टेकवडे थेट लडाखच्या प्रसिद्ध पॅंगाॅंग लेकला पोहचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरभीचे हे फोटो लडाखमध्ये महाराष्ट्राचा मान वाढवणारे आहे
सुरभीने बी-फार्मचं शिक्षण घेतलं आहे. सध्याती बॅंगलोरच्या कंपनीत कामाला आहे.
नऊवारी, चंद्रकोर, नाकात नथ परिधान करुन ती महाराष्ट्राची संकृती देशभर पोचवण्याचं काम करते आहे.
पॅंगाॅंग लेकला जाऊन तो निसर्ग अनुभवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. तेच स्वप्न तिने पाहिलं मात्र महाराष्ट्राचा टच देत तिनं ते स्वप्न पुर्ण केलं.
पुण्यातील अनेक तरुण मंडळींना सध्या लेह-लडाख खुणावतोय. सोलो ट्रिपचा अनेकांना छंद लागला आहे
सुरभीला ट्रॅव्हलर म्हणून काम करायचं आहे. आतापर्यंत तिने महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांना भेट दिली आहे.
चंडीगढ़, दिल्ली, मनाली, सोलंगवैली, रोहतांगवैली, कुल्लू,लेहलद्दाख़,कारगिल, नुब्रा वैली, पॅंगाॅंग लेक, उत्तराखंड या सगळ्या ठिकाणी तिने भटकंती केली आहे.