Hinjawadi Fire Accident News: काळ्याकुट्ट लोखंडावर नखांचे ओरखडे! लॉक झालेला दरवाजा उघडण्याचा आटोकाट प्रयत्न, फोटो पाहून अंगावर येतील शहारे

पुणे शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना काल (बुधवारी, ता-20) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या घटनेमध्ये कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. टेम्पो ट्रॅव्हल्स देखील जळून खाक झाली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 14 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते.

बस कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जात असताना अचानकपणे चालकाच्या पायाखाली आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले.
मात्र, मागचे दार लॉक झाले, ते न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते.
गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते. ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. कोणीतरी त्या बंद दरवाज्याला ओरबाडून उघडायचा प्रयत्न केला होता.
जीवाच्या अकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील. पण तो दरवाजा उघडला नाही. फुटलेल्या काचांवरही असेच निशाण होते. ते शेवटपर्यंत झगडले होते.
या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे, जळालेल्या चपला दिसत होत्या.या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला आहे. गाडीच्या आतील धातू देखील वितळला आहे.
त्या कोळशाखाली अर्धवट जळलेले कपडे, चपला, जेवणाचे डबे, आणि बसला आग लागलेल्यानंतर जीव वाचवण्यासाठी अखेरच्या क्षणी झगडल्याच्या खुणा त्याठिकाणी दिसून येत आहे.
त्या जळालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सच्या एका कोपऱ्यात एक स्टीलचा डबा पडलेला होता. त्याचं झाकण अर्धवट उघडलेलं दिसत होतं.
काही डब्यांची झाकण उघडलेली होतं, तर काही डबे तसेच लावलेले बंद होते. कामासाठी सकाळी घरातून निघालेल्या या कर्मचाऱ्यांच्या हातात दिलेला तो डबा पाहून मन सुन्न होतं.