Pune Dagadusheth Temple : दगडूशेठ गणपतीला दाक्षांची आरास; सजावट पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा सजला होता.
नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दाक्षांची सजावट करण्यात आली आहे.
निर्यातक्षम आणि रसायनविरहित 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
द्राक्षाच्या हंगामात सलग दुसऱ्या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली.
दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
हवामानातील बदलांमुळे तसेच बाजारभाव पडल्यामुळे द्राक्ष शेती सध्या संकटाच्या काळातून जात आहे. यंदाही त्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येत आहेत.
मात्र या संकटातून बाहेर पडण्याची जिद्द शेतकऱ्यांनी बाळगली आहे. विघ्नहर्त्या गणेशाला यानिमित्त शेतकऱ्यांच्या वतीने साकडे घालण्यात आले.