Pune News : निजामुद्द्दीन-गोवा एक्सप्रेसला जेजुरीत थांबा, भंडारा उधळून ग्रामस्थांकडून स्वागत
बहुजनांचा देव असलेल्या जेजुरी खंडोबा नगरीत भविक ग्रामस्थ देवस्थानच्या मागणी वरून लांब पल्याच्या निजामुद्द्दीन-गोवा या रेल्वेगाडीला आजपासून जेजुरीत थांबा मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेजुरी रेल्वे स्थानकात गाडी थांबताच भंडारा उधळून संबळ वाजवत स्वागत करण्यात आले आहे.
श्री मार्तंड देवस्थान आणि जेजुरी गावकरी, मानकरी, खान्देकरी तसेच रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
रेल्वे थांबल्याचा आनंद व्यक्त करत लाडू वाटपही करण्यात आले.
जेजुरी नगरी ही तीर्थक्षेत्र पर्यटन आणि ओद्योगिक नगरी असल्यामुळे देशभरातील विविध राज्यातील लोक येत जेजुरीत येत असतात.
त्यामुळे जेजुरीत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा महत्वाचे होते.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात वारंवार केंद्रीय रेल्वे प्रशासनाने कडे जेजुरीत रेल्वे थांबण्याची मागणी केली होती.
याची दखल घेत आजपासून निजामुद्द्दीन गोवा गाडीला थांबा देण्यात आला आहे.
उर्वरित एक्सस्प्रेस गाड्यांनाही जेजुरी थांब देण्याची मागणी भविक आणि पर्यटकांनी केली आहे.