Pune News : दगडूशेठ हलवाईचा थाटच न्यारा, गणेशजन्म सोहळ्यासाठी 288 तोळ्याचा सोन्याचा पाळणा
श्रीगणेशा पाळणा हलके हलके जोजवा... पाळण्याचा मधोमध याला ग निजवा... अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्ण पाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा दुपारी 12 वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला.
सोहळ्याला डॉ. कृतार्थ क्षीरसागर, डॉ. रिद्धी क्षीरसागर, केदार गोडसे, प्राजक्ता गोडसे यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले.
मंदिरावर केलेली तिरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला.
परदेशी महिलांनी देखील बाप्पाच्या दर्शनासाठी दगडूशेठ मंदिरात हजेरी लावली आहे.
जन्मोत्सवावेळी अनेक महिलांनी गर्दी केली होती.
228 तोळे सोन्याच्या पाळण्यात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.