In Pics: पुण्यातील डॉक्टरच्या एका हाकेला शेकडो 'कश्मिरी महिला' एकत्र का आल्या?
पुण्यातील डॉ. गणेश राख (Pune ) यांनी बेटी बचाओ जनआंदोलनची सुरुवात 3 जानेवारी 2012 ला सुरुवात केली. त्यांची ही यात्रा आता कश्मिरमध्ये पोहचली आहे. त्यांच्या या बेटी बचाव यात्रेत अनेक (kashmir) कश्मिरी महिला सहभागी झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेटी बचाओचा नारा देत हजारो काश्मिरी मुली आणि महिला कश्मिरमधील कुपवाडामधील रस्त्यावर एकत्र आल्या आहेत.
पुण्यातील एका डॉक्टरच्या हाकेला कश्मिरी महिला एकत्र आल्याने डॉक्टरांचं सगळीकडे चांगलच कौतुक होताना दिसत आहे.
डॉ. गणेश राख यांनी पुण्यात त्यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये अकरा वर्षांपूर्वी बेटी बचाओ जनआंदोलनाची सुरुवात केली होती. मुलगी झाल्यास प्रसुती मोफत करतात आणि मुलीच्या जन्माचे हॉस्पिटलमध्ये केक कापून, मिठाई वाटून, सर्वत्र फुलांचा वर्षाव करून स्वागत करतात, असं कार्यक्रमाचं स्वरुप होतं. गेल्या अकरा वर्षात मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये 2450 मुलींची मोफत डिलिव्हरी झाली आहे आणि त्या सर्वांच्या जन्माचे स्वागत करण्यात आले आहे.
काहीच महिन्यात आंदोलन देश विदेशात पसरले. या आंदोलनात जगभरातून 4 लाखा पेक्षा अधिक खाजगी डॉक्टर्स, 13 हजार सामाजिक संस्था आणि 25 लाखांपेक्षा अधीक स्वयंसेवक सहभागी आहेत. हे सगळे आपल्या क्षेत्रात मुलींसाठी योगदान देत आहेत.
बेटी बचाओ जन आंदोलनाच्यावतीने आशा प्रकारच्या एक हजारपेक्षा अधिक रॅली आणि कार्यक्रम देश विदेशात घेतले आहेत. कुपवाडा (काश्मीर) मधील कार्यक्रमाला कडाक्याच्या थंडीत काश्मिरी मूली आणि महिलांची उपस्थिती आणि उत्साह प्रचंड प्रमाणात होता.
या रॅलीचं आयोजन कुपवारा कमिशनर ऑफिस, कुपवारा जिल्हा आरोग्य विभाग,शक्ती मिशन, आशा वर्कर यांनी केलं होतं.
कश्मिरमधील रस्त्यावर या महिला एकत्र आल्याने त्यांचंदेखील कौतुक होत आहे.