Chandrakant patil Birthday: पुण्यातील भाजप नेत्यांनी अनोख्या अंदाजात साजरा केला चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस, पहा फोटो...
पुण्याचे भाजप नेते गणेश बीडकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App63 व्या वाढदिवसानिमित्त सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिरात त्यांच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी तसंच राजकीय वाटचालीसाठी महामृत्युंजय मंत्राचा पठाण करण्यात आलं.
पुरोहितांकडून मंत्राचे पठण करून चंद्रकांत पाटील यांना आशीर्वाद देण्यात आले.
त्यांच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी तसंच राजकीय वाटचालीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती .
यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना आम्हा सगळ्यांकडून परमेश्वरचरणी करतो, अशा शब्दात बीडकर यांनी चंद्रकांत पाटलांना शुभेच्छा दिल्या.