In Pics: परतीच्या पावसाचा हाहाकार! बारामतीतील अनेक घरांत पाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Oct 2022 02:23 PM (IST)
1
बारामतीतून वाहणाऱ्या कऱ्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
काल पुरंदरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने नाझरे धारणातून 35 हजार क्युसेकने पाणी कऱ्हा नदीत सोडण्यात आले आहे.
3
तसंच ओढा, नाल्याचे पाणी देखील कऱ्हा नदीत येत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे.
4
त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे.
5
बारामतीतील शहरातील साठेनगर, आंबेडकरनगर खंडोबानगर या परिसरात नागरिकाच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे.
6
बारामतीतील 50 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळते आहे.
7
जवळपास 35 कुंटुबियांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.
8
नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे..