Baramati News : बारामतीत मनोज जरांगेंचा हुंकार, सभेला अलोट गर्दी; पाहा फोटो
या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान यावेळी मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र द्यायला अडचण काय असा सवाल विचारला.
यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'ज्यांना आरक्षण घ्यायचे आहे त्यांनी घ्या जर नसेल लागत तर नका घेऊ'
तर सरकारला दिलेल्या 40 दिवसांच्या अल्टिमेटमवर देखील मनोज जरांगे यांनी भाष्य केलं.
यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, '24 तारखेला 40 दिवस संपत आहेत, ही लढाई आपल्याला जिंकायची.'
'हे युध्द सरकारला पेलणार नाही आणि झेपणार नाही', असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'आपलेच लोक आपल्याला आडवी येतात. मराठ्यांचे युद्ध थांबवायची ताकद देशात आणि राज्यात कुणाची नाही.'
गावा गावात जाऊन आरक्षण समजून सांगायचे, शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे. आत्महत्या करायची नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
काय करायचे ते 22 तारखेला सांगणार आहे. पुढची दिशा मी 22 ला सांगणार असल्याचं जरांगे यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं.
त्यामुळे आता मनोज जरांगे यांची पुढची भूमिका कोणती असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.