ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम... सुब्रमण्यम स्वामी माऊलींच्या वारी सोहळ्यात सहभागी; टाळ, मृदुंगांच्या तालात तल्लीन
भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी आज पुण्यातील पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुरंदर तालुक्यातील सासवड येथे वारी सोहळ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला.
गळ्यामध्ये टाळ घालून त्यांनी टाळ, मृदंगाच्या तालावर ठेकाही धरला.
यावेळी त्यांच्या समवेत पुरंदरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतरे हे देखील उपस्थित होते.
सासवडमध्ये माऊलींची पालखी ज्याठिकाणी विसाव्याला थांबली होती. तिथे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळेही उपस्थित होत्या.
यावेळी सुब्रमण्यम स्वामी आणि सुप्रीया सुळे यांची भेट झाली. दोघांमध्ये काही काळासाठी चर्चाही झाली.
सुब्रमण्यम स्वामी हे पुरंदरमध्ये आले होते. यावेळी सासवड येथे एका दिंडीमध्ये सहभाग घेत टाळ मृदंगाच्या तालावर त्यांनी ठेका धरला.
यानंतर त्यांनी पालखीतळावर जाऊन माऊलींच्या पालखीचं दर्शनही घेतलं.
ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी विसावा आहे. त्या विसाव्या स्थळाला भेट दिली. तिथे काही काळ त्यांनी वारकऱ्यांसोबत घालवला.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या बाबतची माहिती त्यांनी घेतली.