Ashadhi wari 2023 : ज्ञानोबांसाठी निसर्ग नटला! पालखी सोहळ्याचे दिवे घाटातील विहंगम क्षण, पाहा फोटो...
अवघा रंग एक झाला, जय जय राम कृष्ण हरी या ओळी गात आणि टाळ मृदुंगावर ठेका धरत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने वारीचा सगळ्या महत्वाचा आणि कठीण टप्पा पार केला. (फोटो- फेसबुक दिंडी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवारकऱ्यांनी भर ऊन्हात विठुनामाचा गजर करत दिवे घाट पार केला आहे. (फोटो- फेसबुक दिंडी)
लाखो वारकऱ्यांमुळे दिवेघाटात विहंगम दृष्य़ पाहायला मिळालं. (फोटो- फेसबुक दिंडी)
वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा, आणिक मी देवा काही नेणे, गाये नाचे उडे आपुलीया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, असे अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या तालावर माऊली.. माऊली.. हा जयघोष करत पालखी सोहळा पुढे सरकत होता. (फोटो- फेसबुक दिंडी)
यावेळी सगळी सुख दु:ख विसरुन वारकरी तल्लीन झाले होते. दिवे घाटातील हिरवाईन वारकऱ्यांना चालण्याची शक्ती मिळत होती. (फोटो- फेसबुक दिंडी)
ही हिरवाई जणू काही पालखी सोहळ्यासाठी नटली होती, अशीच अनुभूती येत होती. (फोटो- फेसबुक दिंडी)
लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. (फोटो- फेसबुक दिंडी)