Pune News : अद्भूत आणि अद्वितीय! तब्बल 3700 विद्यार्थ्यांनी साकारली महापुरुषांची मानवी प्रतिकृती
74 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांच्यावतीने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना देत पुन्हा एक अनोखा विक्रम केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात 3700 विद्यार्थी आणि 500 स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या समावेश होता.
विदयार्थीनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना दिली आहे.
हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरीता संस्थेचे 500 हून अधिक स्वयंसेवक गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेत होते.
एकता आणि शांतता हा संदेश आपल्या देशाच्या युवा पिढीपर्यंत पोहचवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या उपक्रमामध्ये राष्ट्रध्वज, नेताजी सुभाष चंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची मानवी प्रतिकृती साकारून मानवंदना देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाची दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन हे देखील आले होते.