In Pics : पोलीस बापाची जिगरबाज मुलगी; बापलेकीने सर केलं एव्हरेस्ट शिखर
पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक यांनी आपल्या मुलीसह एवरेस्ट बेस कँप सर केला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलीस ग्रामीण दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नन्नवरे आणि मुलगी देवयानी नन्नवरे यांनी जगात सर्वात उंच असलेल्या एव्हरेस्ट शिखरावरील चढाईचा बेस कँप पूर्ण केला
त्यांच्या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या नावं गिर्यारोहकांच्या यादीत झळकले आहे. त्यामुळे नन्नवरे पिता पुत्रीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे
पोलीस दलात गडचिरोली येथे कर्तव्य करत असताना त्यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. कामातून वेळ काढून त्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
सायकलिंग, स्विमिंग, रनिंग जवळपासचे परिसरातील मोठे डोंगर चढणे यावर भर दिला पाहिजे त्याच्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो, असं नन्नवरे यांनी सांगितलं आहे.
बापलेकीने केलेल्या या कामगिरीने सगळीकडे त्यांचं कौतुक होत आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांंनी देखील त्यांच्या या कार्याचं कौतुक केलं आहे.