Pune News : तब्बल 403 महाराष्ट्रीयन फेटे बांधून पुणेकरांनी रचला 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'
भारत माता की जय...च्या जयघोषात तब्बल 403 महिला आणि पुरुषांनी फेटे बांधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासोबतच एकाच ठिकाणी सर्वाधिक फेटे बांधण्याचा इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस मध्ये विक्रम प्रस्थापित केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनतर्फे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांसह उपस्थितांनी राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश देखील दिला.
डेक्कन जवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हा विक्रम करण्यात आला.
इंडिया बुक आॅफ रेकॉर्डसच्या पुणे विभागाच्या प्रमुख चित्रा जैन यांनी असोसिएशनच्या संस्थापिका अभिलाषा बेलुरे यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी असोसिएशनच्या अपूर्वा पाटकर, विजया वाटेकर, गायत्री अकोलकर, सविता पवार, आरती कुटुंबे, प्रमुख पाहुण्या डॉ. प्रीती देशमुख आणि डॉ प्रेरणा बेराकी यांसह इतरही सदस्य उपस्थित होते.
एकाच ठिकाणी सर्वाधिक फेटे बांधण्याचा विक्रम महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशने पुण्यामध्ये केला आहे. तब्बल 403 फेटे अवघ्या 59 मिनिटांमध्ये बांधण्यात आले आहेत.
या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश देखील देण्यात आला. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत.
त्यामुळे महिलांना एकत्रित करुन मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा आगळावेगळा उपक्रम होता.