Pune Ganeshotsav 2023 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी 21 फुटी रथ, रथाची पहिली झलक...
यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे.
श्री गणाधीश रथावर 8 खांब साकारण्यात आले आहे.
प्रत्येक खांबांवर हत्तीची मूर्ती साकारण्यात आली असून ते गजस्तंभ दिव्यांच्या प्रकाशात न्हाहून निघणार आहेत.
भगवान शंकरांच्या 8 गणांच्या मूर्ती रथावर असणार आहेत.
त्यासोबतच मागील बाजूस दोन हनुमानाच्या मूर्ती आहेत. रथाचा आकार 15 बाय 15 फूट असून उंची 21 फूट इतकी आहे.
रथावर 1 मुख्य कळस बसविण्यात आला आहे. तसेच त्याच्या भोवती इतर असे मिळून पाच कळस असणार आहेत.
आकर्षक रंगांमध्ये विविध लाईटस् रथावर वापरण्यात आले आहे.