Prabhu Ram Photo : प्रभू श्री रामाच्या मुर्तीचं पहिलं रुप! फोटो आला समोर, घ्या घर बसल्या दर्शन!
अयोध्ये 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भव्य प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Photo credit : ABP MAJHA)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेश-विदेशातील दिग्गजांना रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. देशभरातील रामभक्तांना आता फक्त रामललाच्या भेटीची ओढ लागली आहे. (Photo credit : ABP MAJHA)
देशातील प्रत्येकाच्या मनी रामललाच्या दर्शनाची आस आहे. यापूर्वी गुरुवारी, 18 जानेवारीला गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आलं आहे. (Photo Credit : PTI)
गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर या मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेले सर्व कामगार मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Photo Credit : PTI)
कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. म्हैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. (Photo Credit : PTI)
अरुण यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्प साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. अरुण यांचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार होते. (Photo credit : ABP MAJHA)
प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं भक्तांना दर्शन घेता येणार आहे. रामललाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी एकूण चार तासांपेक्षा अधिकचा वेळ लागणार आहे. भगवान श्रीरामाची ही मूर्ती मंत्रोच्चार आणि पूजाविधींसह पीठावर ठेवण्यात आली आहे. यावेळी शिल्पकार योगीराज यांच्यासह अनेक संतही उपस्थित होते. (Photo Credit : PTI)
आता 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाणार असून प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भक्तांना दर्शन घेता येणारे आहे. राम मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी असलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (18 जानेवारी) प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा गर्भगृहात प्रवेश करण्यात आला. (Photo credit : ABP MAJHA)
ट्रस्टनं ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 18 जानेवारीला दुपारी 1.20 वाजता यजमानांनी मुख्य संकल्प केला, तेव्हा वेदमंत्रांच्या गजरानं वातावरण मंगलमय झाले. गुरुवारी मूर्ती जलाधिवासापर्यंतचं काम पूर्ण झालं. (Photo credit : ABP MAJHA)
बुधवारी रात्री क्रेनच्या साहाय्यानं राम मंदिर परिसरात रामललाची मूर्ती आणण्यात आली. याची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी त्यांचं आसनही तयार करण्यात आलं आहे. प्रभू श्रीरामाचं आसन 3.4 फूट उंच आहे, जे मकराना दगडानं बनलेलं आहे. (Photo credit : ABP MAJHA)