Refined Wheat Flour : 'मैदा' आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम!
मैद्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरते. मैद्यामध्ये शरीराला हव्या असणाऱ्या पोषक तत्वांची कमतरता असते. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमैद्याचे अतिसेवन केल्यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येते तसेच यकृत आणि किडनीला नुकसान होते जे आरोग्यासाठी घातक ठरते. (Photo Credit : unsplash)
मैद्याच्या अतिसेवनामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, त्यामुळे आरोग्यास अनेक समस्या उद्भवतात. (Photo Credit : unsplash)
मैद्याच्या अतिसेवनामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम घडून येतो. स्नायूंचे दुखणे वाढते आणि हाडे कमकुवत होण्याची समस्या उद्भवते. (Photo Credit : unsplash)
मैद्याचा आहारात समावेश केल्यास शरीराला ऊर्जा मिळत नाही, मरगळल्यासारखे वाटते. नकारात्मक जाणवते. (Photo Credit : unsplash)
मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी मैदा खाणे टाळा कारण मैद्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते जे आरोग्यास उत्तम नाही. (Photo Credit : unsplash)
मैदा पांढरा आणि स्वच्छ होण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो, जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरते. मैद्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. (Photo Credit : unsplash)
मैद्यामध्ये फायबरचा अभाव असतो , त्यामुळे मैदा पचायला जड जातो. आपली पचनक्रिया सुरळीत होत नाही, त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात. अॅसिडिटी, जळजळ आणि बद्धकोष्ठता यांचा त्रास होतो. (Photo Credit : unsplash)
मैद्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीच असतात, परिणामी लठ्ठपणा येतो आणि वजन वाढते. मैद्यात स्टार्च मोठ्या प्रमाणात आढळते. (Photo Credit : unsplash)
मैदा नियमित खाल्ल्यानं शरीराची रोग प्रतिकारकशक्ती कमजोर होते. आपण लवकर आणि वारंवार आजारी पडू शकतो. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)