Shivsena UBT : राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंच्या शिवसेनेचं संसदेत नवं कार्यालय सुरु, खासदारांचा फोटो समोर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकसभा संसदीय कार्यालयाचे उद्घाटन काल करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवसेना नेते, संसदीय दल नेते, खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते लोकसभेचे गटनेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते सेनेच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन झालं.

शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई,खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय दिना पाटील, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार संजय देशमुख, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि उपनेत्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी,तसेच कर्मचारी उपस्थित होते.
एकीकडे राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु असताना नवी दिल्लीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय कार्यालयाच्या उद्घाटनाला लोकसभेतील 9 पैकी 8 खासदार उपस्थित होते.
ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेत दोन खासदार आहेत. संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेत आहेत.
ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाझे यांनी अशा काही चर्चा नसल्याचं म्हटलं आहे.