Sharad Pawar on Ajit Pawar : सगळ्या देशाला माहित आहे ,राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली,तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय
सगळ्या देशाला माहित आहे की, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली. तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय आहे. आयोगाचा निर्णय अन्यायकारक आहे. विधानसभा अध्यक्ष वेगळा निर्णय देणार नाही,याची खात्री होती. शिवसेनेसोबतही त्यांनी असाच निर्णय घेतला, आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपक्ष आणि चिन्हाचा निर्णय सेटलमेंट करुन घेतला,मी अनेक निवडणूक अनेक चिन्हवर लढलो. एखाद्याच्या वाटत असेल की एखाद्याची चिन्ह काढून घेतली तर त्याचं अस्तित्व काढून घेऊ तर तसे होत नसतं. नवीन चिन्ह आपल्याला मिळेल, ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. (Photo Credit : PTI)
पक्ष आणि चिन्हाबद्दल निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला, असा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे. आपल्यावर अन्याय होणारे निर्णय होतील. पक्षाला पुढची तयारी केली पाहिजे, त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात गेल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.(Photo Credit : PTI)
अन्याय करणारा निकाल,धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर शरद पवार म्हणाले की, भाजपचे संसदेत बहुमत आहे. सरकारने विरोधी पक्षाशी चर्चा केली तर धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव आणत असतील तर विरोधक साथ आणि सहकार्य देतील. (Photo Credit : PTI)
मात्र वेगळी भूमिका कोर्टात मांडणे म्हणजे या घटकांना आरक्षण न देण्याचे धोरण आहे. त्यामुळेच या वर्गावर अन्याय करणारा निकाल लागला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Photo Credit : PTI)
आव्हाडांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार,ते पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे जे बोलले त्यांनी राष्ट्रवादीत त्यांचा कालखंड गेला. त्याच्या कितीतरी वर्षापासून जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी पक्षात काम करत आहेत. (Photo Credit : PTI)
जितेंद्र आव्हाड यांनी देश आणि राज्य पातळीवर काम केले आहे. ते मंत्री राहिले आहेत. आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आव्हाडांनी काय बोलावे याचे मार्गदर्शन करण्याची अन्य लोकांना गरज नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. (Photo Credit : PTI)