छत्रपतींचा रायरेश्वर किल्लाही मतदानासाठी सज्ज!
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ ज्या रायरेश्वर किल्ल्यावर घेतली त्या रायरेश्वर किल्यावर मतदान होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमतदानासाठी मतदान यंत्रे आणि इतर साहित्य शिडीच्या सहाय्याने पोहचवण्यात आले आहे.
साडेचार हजार फुट उंचीवरील रायरेश्वर किल्ल्यावर 160 मतदार आहेत.
त्यांच्यासाठी किल्ल्यावर एक मतदान केंद्रं तयार करण्यात आले असून तीन निवडणूक अधिकारी मतदानाची प्रक्रिया सांभाळणार आहेत.
शिवकाळापासून रायरेश्वर किल्ल्यावर जंगम समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यातील 160 जण मतदानासाठी पात्र आहेत.
त्यांच्यासाठी शिडी आणि दोरखंडाच्या सहाय्याने निवडणूक साहित्य पोहच करण्यात आले.
गडावर पोहचल्यावर मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी या कर्मचाऱ्यांना एक तास चालावं लागलं.
रायरेश्वर किल्ला भोर तालुक्यात येतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.