NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची प्रफुल पटेलांच्या घरी बैठक, अजित पवार, तटकरे उपस्थित राहणार, महायुतीत किती जागा लढणार? मोठी अपडेट समोर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस सध्या महायुतीत भाजप आणि शिवसेनेसोबत आहे. सध्या विधानसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात बैठक होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन वेळा बैठका पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अंतर्गत बैठक दहा वाजता पार पडणार आहे.
बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत.
महायुतीच्या यापूर्वी दोन बैठका झाल्या होत्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 60 पेक्षा जास्त जागांवर लढण्यावर ठाम राहण्याची भूमिका घेतली होती.
महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 60 ते 65 जागा मिळण्याची शक्यता असल्याची एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या वरळी येथी घरी बैठक पार पडल्यानंतर महायुतीच्या नेत्यांसोबत पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.